मराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश. या संदर्भकोशाचे काम गेले सुमारे ६ महिने सुरु असून आतापर्यंत २५००० व्यक्तिमत्त्वांची माहिती या संदर्भकोशासाठी संकलित झाली आहे. या संदर्भकोशाचे विधिवत लोकार्पण लवकरच होणार आहे. या व्यक्ती-संदर्भ कोशाची ही एक झलक.
वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध मराठी व्यक्तींविषयी माहिती, त्यांच्याबाबत इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या साईटच्या लिंक्स तसेच छायाचित्रे, ध्वनीफीती, चित्रफीती यांचा प्रचंड मोठा संग्रह हे या व्यक्ती-संदर्भ कोशाचे वैशिष्ट्य आहे. अशाप्रकारचा मराठी व्यक्तींचा मोठा संदर्भकोश असलेली ही एकमेव वेबसाईट आहे.
या संदर्भकोशातील माहिती डाव्या बाजूला असलेल्या विविध वर्गवारीप्रमाणे प्रकाशित केलेली आहे.आपणही आपल्याला माहित असलेल्या नामवंत / सुपरिचित / प्रकाशित / अप्रकाशित अशा सर्व प्रकारच्या व्यक्तींविषयी माहिती पाठवून या कार्यात आपला सहभाग द्यावा तसेच आपली स्वत:ची माहितीही जरुर पाठवावी ही विनंती.
आपण माहिती इ-मेल द्वारेही पाठवू शकता. तसेच लिखित स्वरुपातील माहिती स्कॅन करुनही पाठवू शकता.