मुले आणि मृगजळ

दिवाळी दसरा संपला की १० वी च्या मुलांना परीक्षेचे वेध लागतात विशेषतः पालकांना, त्या मध्ये स्त्री पालक प्रचंड आग्रही कारण तिची स्पर्धा अनेकांशी असते . आपण जरा एक दोन पिढ्या मागे जाऊन बघितले तर सध्याकाळी परवचा म्हणणे म्हणजे पाढे म्हणणे , त्यानंतर जेवण. आत मात्र ती वेळ सिरिअल्स आणि क्लासेसने घेतली. ह्या पाढे म्हणण्यामागे एक वेगळे कारण होते ते आत्ता जाणवते ते म्हणजे स्मरणशक्तीची ती मशागत होती , त्यामुळे स्मरणशक्ती वाढायची . गाईड बाळगणे हे कमीपणाचे लक्षण होते.
ह्या सर्व गोष्टीमुळे एकदा वाचले की लक्षात यायचे, पण आत्ता सुरु झाली घोकंपट्टी , घोकंपट्टीमुळे ७ वी, ८ वी पर्यंत चालून जाते. पण पुढे मात्र ९ वी , १० वी मध्ये मात्र सगळे गणित बिघडले जाते. पाठ करून करून किती करणार, काही मुंलामध्ये ती क्षमता असते ती मुले भरपूर गुणही मिळवतात परंतु ११ वी आणि १२ वी मध्ये तोच मुलगा ८५ वरून ५५ वरही येतो.
परंतु खालची फळी आणि मधली फळीमधली मुले सपशेल गोंधळतात . ह्याचा विचार पालक, त्याचे शिक्षक यांनी कधी केला आहे का .तोच विचार आपल्याला या ‘ ८ वी ड ‘ मध्ये करायचा आहे. हा तुमचा माझा एक संवाद आहे कधी मी पण चुकेन तर मला जरूर सागा , कारण हीच मुले आपला, आपल्या समाजाचा आधारस्तभ होणार आहेत , जर आत्ताच नाही सावरले तर हीच मुले उद्याची ‘ भाई किवा दादा ‘ होऊन समाजाचे वेगळ्या प्रकारे रक्षण-भक्षण करतील.
आज आपल्या हातात आहे , उद्या देखील आहे पण आजचे आपलेच निर्णय हे उद्याचे फळ आहे. मुले ही मुले असतात किबहुधा आईवडिलांचा आरसा, प्रतिमा असतात असे म्हणतात परन्तु निरनिराळ्या माध्यमामुळे ही मुले लवकर तरुण होत आहेत ह्याचे कितपत भान पालकांना-शिक्षकांना आहे ह्याचाही शोध घेणे आवश्यक आहे . मला वाटते ते भान पालकांना आधी यायला हवे ते येत नाही कारण आपली मुले वयाने लहान आहेत किवा माझा मुलगा-मुलगी असे वेडेवाकडे करणार नाही असा फाजील आत्मविश्वास त्यांच्यामध्ये ठासून भरलेला असतो. माझा एक सातवीच्या मुलाचा अनुभव सांगतो त्याला प्रेम बीम काही माहित नव्हते असे नाही सर्वच अर्धवट माहिती होती. त्याला जी मुलगी आवडायची तिला पत्र द्यायचा ते झेरॉक्स पत्र होते , कुणाकडून लिहिले होते , बर्याच कॉपी होत्या म्हणे , तो फक्त वरती मुलीचे नाव लिहावयाचा. एकदा पकडला गेला काही पालक बोबलत आले. मुलगा लहान होता कुणीतरी बोलले आणि भाई झाडावर चढला. त्याची आई आली तिला खरे वाटले नाही. शेवटी मी तिला शांत केले. मुलाला समजवले लहान आहेस म्हणून ठीक नाही तर लोक तुडवतील हे जरा वेगळ्या शब्दात सांगितले. तेव्हा ते भाई शांत झाले. ह्या गोष्टी लहानपणीच समजावल्या तर चागले असते . फक्त त्या वेळीच कळणे आवश्यक असते आणि ती वेळ समजून घेण्याची ताकद पालकामध्ये पाहिजे आणि हो तितकाच समंजसपणाही.

About satishchaphekar 14 Articles
मी सतिश चाफेकर. मी सह्याजीराव या नावानेही प्रसिद्ध आहे.. कारण माझा सह्यांचा संग्रह. यासाठी मला सहा वेळा लिम्का बुक ॲऑफ रेकॉर्डस मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*