ओळख… सह्याजीराव
नाव …… सतीश चाफेकर
शिक्षण…..बी . कॉम , बी . ए . , एम ए .
शाळा……. मो. ह. विद्यालय
कॉलेज…….ठाणे कॉलेज.
नोकरी……ठाण्यातील रत्नाकर जोशी यांच्या कंपनीत होतो. त्यानंतर मिशिगन इंजिनीअर्स प्रा. लिमिटेड मध्ये होती.
त्यानंतर अचानक नोकरी सोडली आणि डोंबिवली मध्ये राहत असताना , घरातच लहान क्लास चालू केला तो नापास मुलांसाठी आणि बॅक बेंच मुले तसेच झोपडपट्टी मधील मुलांना २४ वर्षे शिकवले.
हे सर्व चालू असताना १९७७ पासून रेडिओ वर कार्यक्रम करत आहे.
सध्या माझ्या नावावर ६ लिम्का रेकॉर्डची नोंद आहे.
गेली सुमारे ५५ वर्षे स्वाक्षऱ्या जमा करतोय, सध्या ११,००० च्या वर स्वाक्षऱ्या जमा करत आहे. त्यामध्ये जॅकी चॅन, नील आर्मस्ट्राँग , रिचर्ड गेर, सचिन तेंडुलकर , अटलबिहारी वाजपेयी, सुभाष चंद्र बोस यांची मुलगी अनिता बोस , कॅप्टन लक्ष्मी अशांच्या हजारो स्वाक्षऱ्या स्वतः घेतल्या आहेत.
भारतातील सर्व वृत्तपत्रांनी चॅनल्स नी माझ्या छंदा ची दखल घेतली आहे , तसेच अल झझिरा या चॅनल वर मुलाखत झाली आहे.
लोकसत्ता, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स , गावकरी , सकाळ अशा अनेक वृत्तपत्रातून सुमारे १५०० च्या आसपास लेख लिहिले आहेत.
मॅजेस्टिक गप्पा, नाशिक, रत्नागिरी , ठाणे , डोबवली , कल्याण अशा अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले आहेत. तसेच साहित्य संमेलन , नाट्य संमेलन स्वाक्षरी प्रदर्शने झाली आहेत .
माझे स्वतःचे आगळे वेगळे भारतातील एकमेव स्वाक्षरी संग्रहालय डोंबिवली येथे असून. त्याचीही नोंद लिम्का बुक मध्ये झाली आहे.
तेथील भिंतींवर डॉ माशेलकर , डॉ विजय भटकर, वसंत गोवारीकर, कवी ग्रेस, बाबासाहेब पुरंदरे , रत्नाकर मतकरी , प्रवीण दवणे , महेश काळे , क्रिकेट पटू जयांतीलाल , पद्माकर शिवलकर तर राजकीय नेते गोविंदाचार्य , संजय राऊत, माधव भंडारी यांनी स्वतः तेथे येऊन स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
त्याचप्रमाणे गायक रवींद्र साठे , आरती अंकलीकर , उत्तरा केळकर , महेश काळे , शौनक अभिषेकी यांनी तेथे प्रत्यक्ष येऊन स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
त्याच प्रमाणे अरुण नलावडे , अतुल परचुरे, प्रकाश आमटे मंदाकिनी आमटे , वासुदेव कामत यांच्यासारख्या सुमारे १६० जणांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.