पहिला भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा

आजच्या दिवशी पहिला भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांची आठवण आलीच पाहिजे…

स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा यांचा जन्म १३ जानेवारी १९४९ रोजी पंजाबमधील पतियाळा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव देवंद्र शर्मा तर आईचे नाव तृप्ती शर्मा असे आहे. राकेश शर्मा यांचा जन्म झाल्यावर त्यांचे आईवडील आंध्र प्रदेश येथील हैद्राबाद शहरामध्ये रहाण्यास गेले. राकेश शर्मा याना तेथील सेंट जॉर्ज ग्रामर स्कुलमध्ये या शाळेमध्ये ते जाऊ लागले. शालेय शिक्षण झाल्यावर राकेश शर्मा यांना हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापीठामध्ये जाऊ लागले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना १९६६ मध्ये त्यांची निवड NDA म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा अकादमी मध्ये त्यांची निवड झाली आणि ते तेथे ट्रैनिंगसाठी गेले. खरे तर लहानपानापासूनच त्यांना सायन्स या विषयाची आवड होती. शाळेमध्ये असताना त्यांना विज्ञान या ह्या विषयामध्ये आवड होती.

त्यांचे राष्ट्रीय अकादमीमधले ट्रैनिंग पुरे झाल्यावर १९७० मध्ये वायू सेनेत त्यांची टेस्ट पायलट म्हणून त्यांची निवड झाली अशा तर्हेने त्याकनही पायलट होण्याची इच्छा पुरी झाली. त्यांना भारतीय वाय दलामध्ये लढाईची विमाने उडवण्याची संधी मिळाली. १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धाच्या दरम्यान त्यांनी मिग विमाने उडवून आपली योग्यता सिद्ध केली. त्यांची योग्यता पाहून १९८४ मध्ये ते भारतीय वाय सेनेमध्ये स्क्वाडन लीडर ह्या पदावर पोहोचले. ह्या दरम्यान २० सप्टेंबर १९८२ मध्ये राकेश शर्मा आणि एक भारतीय नागरिक रवीश मल्होत्रा ह्यांची भारत आणि सोविएत संघ यांच्या संयुक्त अंतरीक्ष अभियानसाठी निवड केली दोघांपैकी एकाला अंतराळ प्रवासाची संधी मिळणार होती. ह्या मोहिमेमध्ये तीन जण जाणार होते दोन जण रशियाचे आणि एक भारतीयाचा समावेश त्यामध्ये रहाणार होता. रवीश मल्होत्रा आणि राकेश शर्मा या दोघांना सोविएत संघाच्या कजागिस्तान येथे असलेल्या बैकानुर येथे त्यांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. तेथे राकेश शर्मा तेथे योग्य ठरले आणि त्यांची निवड यात्रेसाठी केली गेली.

२ एप्रिल १९८४ रोजी आपल्या दोन रशियन अंतराळवीरांबरोबर सोयुज टी – ११ मधू अंतरिक्षामध्ये उड्डाण केले. त्यानंतर ते तिघेही सोव्हियत संघाच्या स्थापन केलेल्या ऑरबिटल स्टेशन सोल्युज – ७ मध्ये गेले. आणि अशा तर्हेने भारत हा अंतरिक्षामध्ये माणूस पाठवणारा जगामधला १४ वा देश बनला . राकेश शर्मा हे जवळजवळ ८ दिवस म्हणजे ७ दिवस २१ तास ४० मिनिटे स्पेस स्टेशनमध्ये होते. ह्या दरम्यान अंतरिक्ष दलाने वेज्ञानिक आणि टेक्निकल अभ्यासासंबंधी ३३ प्रयोग केले. राकेश शर्मा याना त्या दरम्यान विशेष करून बायो-मेडिसन आणि रिमोट सोर्सिंगच्या संबंधाने संशोधन करण्याची जबाबदारी मिळाली होती. राकेश शर्मा हे अंतराळ प्रवास करणारे जगामधील १३८ वे अंतराळवीर ठरले. भारत आणि सोविएत संघ ह्यांच्या ह्या अंतरिक्ष मिशनमध्ये राकेश शर्मा यांनी भारत आणि हिमालय क्षेत्रातही फोटोग्राफी केली आहे.

राकेश शर्मा यांचा अंतराळ प्रवास चालू असताना राकेश शर्मा यांनी त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी चर्चा केली त्यावेळी त्यांना इंदिरा गांधी यांनी प्रश्न केला होता , ” अंतरिक्षामधून भारत कसा दिसत  आहे ? ” ह्या इंदिरा गांधी यांच्या प्रश्नाला राकेश शर्मा यांनी उत्तर दिले होते , ” सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा ….” त्यावेळी हा सवाल जवाब देशामधील सर्व वृत्तपत्रांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता त्याचप्रमाणे दूरदर्शवरही ही क्लिप खूप लोकप्रिय झाली होती. मागासलेल्या धर्मांध लोकांनी निषेधही केला होता परंतु राकेश शर्मा यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते.

अंतरिक्ष मोहिमेवरून आल्यानंतर राकेश शर्मा यांचे जोरदार स्वागत झाले. भारत सरकारने त्यांना ‘ अशोक चक्र ‘ बहाल केले. तर सोविएत रशियाने त्यांना ‘ हिरो ऑफ सोविएत युनियन ‘ ह्या पुरस्काराने सन्मानित केले. १९८७ मध्ये राकेश शर्मा यांना भारतीय वायुसेने मध्ये विग कमांडर म्हणून नियुक्त केले. त्यामधून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांना ‘ हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ( HAL ) ह्यामध्ये त्यानी टेस्ट पायलट म्ह्णून काही वेळ काम केले.

राकेश शर्मा अत्यंत सौम्य प्रकृतीचे गृहस्थ असून त्यांचा विवाह कर्नल पी. एन . शर्मा यांची मुलगी मधू शर्मा यांच्याशी झाला असून दोघा पती-पत्नींना रशियन भाषा अवगत आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून ते दोघेही ‘ मीडिया ‘ शी संबंधित आहेत.

मी त्यांना मुंबईमधील आय. आय. टी . मध्ये भाषण ऐकले होते तेव्हाच त्यांची स्वाक्षरी घेतली होती.

२००६ मध्ये राकेश शर्मा यांना ‘ भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संघठन ‘ म्हणजे ‘ ISRO ‘ च्या बोर्ड मध्ये समाविष्ट केले. त्यानंतर ते एका कंपनीमध्ये ‘ ऑटोमेटेड वोर्कफलोर ‘ कंपनीमध्ये नियुक्त झाले. आजही ते अनेक महाविद्यालयात मुलांना भेटण्यास जातात.

— सतीश चाफेकर

About satishchaphekar 14 Articles
मी सतिश चाफेकर. मी सह्याजीराव या नावानेही प्रसिद्ध आहे.. कारण माझा सह्यांचा संग्रह. यासाठी मला सहा वेळा लिम्का बुक ॲऑफ रेकॉर्डस मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*