सुप्रसिद्ध क्रिकेटपटू जेफ लॉसन

जेफ लॉसन याचा जन्म ७ डिसेंबर १९५७ रोजी वागा वागा , न्यू साऊथ वेल्स , ऑस्ट्रेलिया येथे झाला.

जेफ लॉसन हा राईट आर्म फास्ट गोलंदाज होता. जेफ लॉसन पहिल्यांदा लक्षात आला तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या जेफ बायकॉटला बाउन्सर टाकताना १९७८-७९ च्या एन .एस. डब्लू . आणि इंग्लंड विरुद्धच्या सामन्यामध्ये . खरे तर त्याला १९७९ च्या भारताच्या टूरवर आणले होते परंतु त्याला त्याचा पाहिला कसोटी सामना भारतात खेळता आला नाही . त्याचप्रमाणे १९८० मध्ये त्याला पाकिस्तानच्या टूरसाठी नेण्यात आले परंतु तेथेही त्याला कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

जेफ लॉसन त्याचा पहिला कसोटी सामना खेळला तो नोव्हेंबर १९८० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ब्रिस्बेन येथे त्यावेळी त्याने ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने त्याच्या तिसर्या कसोटी सामान्यातच पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सला ८१ धावा देऊन ७ विकेट्स घेतल्या त्यामुळे त्यावेळी त्याला ‘ मॅन ऑफ द मॅच ‘ चे अवॉर्ड मिळाले. परंतु त्याला शेवटचे तीन कसोटी सामने पाठदुखीमुळे खेळता आले नाहीत. त्याला सतत पाठदुखीने सतावले होते . त्या ऑस्ट्रेलियन सीझनमध्ये त्याला फक्त एकच सामना खेळता आला तो वेस्ट इंडिजविरुद्ध मेलबॉर्न येथे .

पुढे १९८२ मध्ये ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तानच्या टूरवर असताना त्याने ‘ जलद गोलंदाज ‘ म्हणून स्वतःला सिद्ध करताना तीन कसोटी सामन्यामध्ये ३३.५५ च्या सरासरीने ९ विकेट्स घेतल्या. जायबंदी डेनिस लिलीच्या अनुपस्थितीमध्ये तो जास्तीचा जलद गोलंदाज म्हणून गोलंदाजी करत असे , त्याने तेव्हा २०.२० च्या सरासरीने ३४ विकेट्स घेतल्या. त्याने पर्थला पहिल्या कसोटी सामन्यामध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये १०८ धावा देऊन ५ विकेट्स घेतल्या त्याचप्रमाणे ताईने ५० धावाही केल्या होत्या.

जेफ लॉसन संधी मिळताच त्याच्या जलद गोलंदाजीने विकेट्स घेताच होता. ब्रिस्बेनला एक सामन्यामध्ये त्याने १३४ धावा देऊन ११ विकेट्स घेतल्या तर अँडलेटला त्याने एका इनिंगमध्ये ४६ धावा देऊन ४ विकेट्स घेतल्या तर दुसऱ्या इनिग्माध्ये ६६ धावा देऊन ५ विकेट्स घेतल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया ती अँशेसची सिरीज २-१ ने जिंकली.

जेफ लॉसनने वर्ल्ड कप सिरीज खूप एन्जॉय केली कारण त्याने १५.८० च्या सरासरीने दहा एकदिवसीय सामन्यामध्ये १६ विकेट्स घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा फायनल मध्ये पराभव केला. परंतु त्यापुढील श्रीलंकेची त्याची हुकली परंतु १९८३ च्या वर्ल्ड कपमध्ये त्याने ४ सामन्यामध्ये फक्त ५ विकेट्स घेतल्या होत्या आणि ऑस्ट्रेलिया सेमी फायनलच सामना हरली होती. मात्र १९८४-८५ मध्ये मात्र लॉसन परत फॉर्म मध्ये आला, वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना त्याने २५.६० च्या सरासरीने २३ विकेट्स घेतल्या. तिसऱ्या अँडलेटमधील कसोटी सामन्यांमध्ये त्याने ११२ धावा देऊन ८ विकेट्स घेतल्या हा त्याचा फलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या पिचवरचा ‘ मॅरेथॉन स्पेल ‘ होता असे म्हटले जाते. त्यावेळी त्याने ४९ धावाही केल्या परंतु ऑस्ट्रेलिया तो सामना हरली आणि सिरीजसुद्धा १-३ ने हरली . ह्या शेवटच्या स्पेलमध्ये त्याने १५ एकदिवसीय सामने खेळले त्यामध्ये १७ विकेट्सही घेतल्या परंतु परत त्याची निवड ऑस्ट्रेलियामधील एकदिवसीय सामन्यासाठी झाली नाही.

१९८६-८७ मध्ये तो अँशेस सिरीजमध्ये सामना खेळला तर १९८८-८९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध , नंतरच्या सामन्यात त्याने तीन विकेट्स घेतल्या , परंतु या सामन्यांमध्ये त्याला अँब्रोजचा एक चेंडू जबडयावर लागल्यामुळे तो जायबंदी झाला. त्याला त्यातून बरे व्हायला बराच काळ लागला. परंतु १९८९ च्या इंग्लंड टूरमध्ये २७.२७ च्या सरासरीने २९ विकेट्स घेतल्या आणि परत अँशेस ४-० ने जिकली .

जेफ लॉसन याने शेवटचा कसोटी समान नोव्हेंबर १९८० रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला तर शेवटचा एकदिवसीय सामना ऑक्टोबर चौथ्या कसोटी सामन्यात झाला त्याने पहिल्या इनिंगमध्ये ७२ धावा देऊन ६ खेळाडू बाद केले तर दुसऱ्या इनिंगमध्ये ८१ धावा देऊन ३ खेळाडू बाद केलं. ह्याच सामन्यामध्ये त्याने कसोटी सामन्यामधील सर्वोच्च ७४ धावा करताना स्टीव्ह वॉ बरोबर १३० धावांची भागीदारी केली. १९८९ रोजी भारतीय संघाविरुद्ध खेळला .

जेफ लोशन याने ४६ कसोटी सामन्यामध्ये ८९४ धावा केल्या त्यामध्ये त्यांच्या सर्वोच्च धावा होत्या ७४ त्याचप्रमाणे त्यांनी ४ अर्धशतके केली. त्यांनी १८० विकेट्स घेतल्या . त्यामध्ये त्यांनी एका इनिंगमध्ये ५ किंवा ५ पेक्षा जास्त विकेट्स ११ वेळा घेतल्या तर एका सामन्यांमध्ये १० किंवा १० पेक्षा जास्त विकेट्स २ वेळा घेतल्या. त्यांनी एका इनिंगमध्ये ११२ धावा देऊन ८ विकेट्स घेतल्या. जेफ लॉसन याने ७९ एकदिवसीय सामन्यामध्ये ३७८ धावा केल्या त्यामध्ये त्यांनी ८८ विकेट्स घेतल्या . त्यांनी एका इनिंगमध्ये २६ धावा देऊन ४ खेळाडू बाद केले.

निवृत्तीनंतर जेफ लॉसन याने कोच म्हणून , वक्ता म्हणून , खेळ पत्रकार म्हणून अशा अनेक भूमिका तो आजही निभावत आहे. त्याचप्रमाणे त्याने क्रिकेटवर अनेक पुस्तके लिहिली आहेत. २००६ साली त्याला ऑक्सफर्ड ब्रुक्स विद्यापीठाची डॉक्टरेट देखील दिली गेली. तर २००७-०८ मध्ये मेलबॉर्न क्रिकेट क्लब चे अध्यक्ष म्हणून काम पाहिले.

— सतीश चाफेकर.

About satishchaphekar 14 Articles
मी सतिश चाफेकर. मी सह्याजीराव या नावानेही प्रसिद्ध आहे.. कारण माझा सह्यांचा संग्रह. यासाठी मला सहा वेळा लिम्का बुक ॲऑफ रेकॉर्डस मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*